नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील टेंबुर्णी येथे फिरण्यासाठी दुचाकी न दिल्याच्या कारणावरुन एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील हरणखुरी येथील सुनिल गणपत पावरा यांनी फिरण्यासाठी दुचाकी दिली नाही. या कारणावरुन अजय सुनिल पावरा, प्रशांत सुनिल, गिताबाई प्रशांत पावरा व निमाबार्स अजय पावरा (सर्व रा.हरणखुरी ता.धडगाव) यांनी काठीने व हाताबुक्यांनी माहाण केली.
तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत सुनिल पावरा यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.शशिकांत वसईकर करीत आहेत.








