Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

२२ व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत नंदुरबारच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद

team by team
August 26, 2022
in राज्य
0
२२ व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत नंदुरबारच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपद
नंदुरबार |  प्रतिनिधी
नंदुरबार येथे २२ व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांचे नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांचे उपस्थितीत समारोप करण्यात आला.यात नंदुरबारच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले असुन  सर्वोत्कृष्ट पुरुष ऍथलॅटीक्सचा पुरस्कार पोलीस शिपाई भुषण चित्ते,सर्वोत्कृष्ट महिला ऍथलॅटीक्सचा पुरस्कार महिला पोलीस शिपाई दिव्या वाघमारे यांनी पटकविला .
दि. २३ ऑगस्ट २०२२ रोजी पासून पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या २२ व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांचे नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत समारोप समारंभ संपन्न झाला .
२३ ऑगस्ट पासून पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या २२ व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये पोलीस मुख्यालय , नंदुरबार , नंदुरबार विभाग , शहादा विभाग , अक्कलकुवा विभाग असे ४ संघ हे सांघिक व वैयक्तिक खेळ यामध्ये स्विमींग , कुस्ती , ज्युडो , बॉक्सींग , वेटलिफ्टींग , १०० , २०० , ४०० , ८०० मीटर धावणे , फुटबॉल , हॉकी , व्हॉलीबॉल इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता . प्रत्येक संघामध्ये साधारणत : ६० खेळाडू असे एकुण २४० सांघिक व वैयक्तिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता .
तीन दिवसांपासून जिल्हा पोलीस दलाच्या कवायत मैदानावर खेळल्या गेलेल्या २२ व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत पोलीस मुख्यालय नंदुरबारच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले आहे . सर्वोत्कृष्ट पुरुष ऍथलॅटीक्सचा पुरस्कार पोलीस शिपाई भुषण चित्ते,सर्वोत्कृष्ट महिला ऍथलॅटीक्सचा पुरस्कार महिला पोलीस शिपाई दिव्या वाघमारे यांनी पटकविला .
सर्व पदक प्राप्त खेळाडूंचा नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला . तसेच २२ व्या जिल्हा पोलीस क्रीडा समारोप प्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना , निरोगी शरीरात निरोगी मन वास करीत असते . त्यामुळेच खेळाचे मानवी जिवनात अनन्य साधारण असे महत्व आहे . पोलीस दलात दैनंदिन काम करीत असतांना कामाच्या अतिरीक्त ताणामुळे पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे आपल्या स्वतःच्या शरीर स्वास्थ्याकडे कायमच दुर्लक्ष होत असते .
त्या सर्वांतून बाहेर पडून प्रत्येकाने आपल्या स्वास्थ्याकडे काळजीपूर्वक लक्ष पुरविले पाहिजे . वर्षभर चालत असलेले सततचे बंदोबस्त तसेच तपास यासारख्या गोष्टीमुळे पोलीस दलातील प्रत्येक व्यक्ती कायमच व्यस्त असते . या सर्वातून विरंगुळा व्हावा तसेच शरीर स्वास्थ्याच्या प्रती प्रत्येकाने सजग व्हावे यासाठी दरवर्षी जिल्हा स्तर , विभाग स्तर व राज्य स्तर येथे पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते . सन -२०१९ , २०२० व २०२१ या वर्षी कोविड निबंधांमुळे नाशिक विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा व महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या . मागील सलग तीन वर्षी क्रीडा स्पर्धा न झाल्याने या वर्षीच्या क्रीडा स्पर्धा खेळाडू पोलीस अमंलदार यांच्यात एक नवा उत्साह आहे . २२ व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभप्रसंगी उपस्थित पोलीस अधिकारी व पोलीस अमलदारांच्या कुटुंबीयकरीता संगीत खुर्ची , लिंबु चमचा , मटकी फोड , रस्सी खेच इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले होते . नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांनी संगीत खुर्चीच्या खेळात सहभाग घेवून पोलीस अमंलदारांच्या कुटुंबीयांचा उत्साह वाढविला .
त्याचप्रमाणे पोलीस अमलदारांचे कुटुंबीय विरुध्द् पोलीस दलातील महिला पोलीस अमलदार यांच्यात देखील रस्सी खेचचा कार्यक्रम घेण्यात आला . सदर खेळात पोलीस कुटुंबीयांच्या संघाचे नेतृत्व नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी केले होते त्यात त्यांचा विजय झाला . तसेच सदर कार्यक्रमास उपस्थित असलेले नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी व पत्रकार यांचे रस्सी खेच हा सामना उत्कंठा वाढविणारा होता . पोलीस अधिकारी व पोलीस अमलदारांच्या कुटुंबीयकरीता आयोजीत कार्यक्रमात विजते ठरलेल्यांना देखील यावेळी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले . त्याचप्रमाणे २२ व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये वैयक्तीक क्रीडा प्रकारामध्ये प्रथम , द्वितीय , तृतीय आलेल्या पुरुष पोलीस अमंलदार , महिला पोलीस अमलदार व सांघिक क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय , तृतीय आलेल्या संघाचे अभिनंदन करुन कौतूक केले . तसेच २२ व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक अभिनंदन करुन पुढील काळात होणार्‍या नाशिक विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धा व महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा यात सहभागी होणार्‍या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या .
२२ व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री , नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील नंदुरबार जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , पोलीस उप अधीक्षक ( मुख्यालय ) विश्वास वळवी , आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान , नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी  सचिन हिरे , शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी  श्रीकांत घुमरे , अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी  संभाजी सावंत यांचेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस खेळाडू उपस्थित होते .
बातमी शेअर करा
Previous Post

गणेशोत्सव साजरा करतांना नियमांचे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

पत्नीबाबत अश्‍लील मागणी केल्याचा रागातनु तरुणाचा खून

Next Post
पत्नीबाबत अश्‍लील मागणी केल्याचा रागातनु तरुणाचा खून

पत्नीबाबत अश्‍लील मागणी केल्याचा रागातनु तरुणाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add