नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्व दिव्यांग, मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शासनाकडुन मिळणारे वैयक्तिक लाभ योजनाअनुदान जसे शिष्यवृत्ती, दिव्यांग कल्याणाच्या योजना, मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनाचा लाभ मिळण्यासाठी आपले वैयक्तिक राष्ट्रीयकृत बँकेचे खाते आधारकार्डशी जोडण्यात यावे.
जेणेकरुन शासनाकडून मंजूर झालेले अनुदान थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात वर्ग करता येईल. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगांवकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.








