नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील बोरद येथील कुणाल राजेंद्र राजपूत (वय १४) या अल्पवयीन मुलाला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले.
याबाबत नरेंद्र लोटनसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिलो पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे करीत आहेत.








