Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मनवाणीत कडक बंदोबस्तात साजरा होणार बैलपोळा, १०० जणांचे सुरक्षाबल तैनात, शांतता व सुव्यवस्थेसाठी २५ कमिट्या व ५० स्वयंसेवक

team by team
August 25, 2022
in क्राईम
0
मनवाणीत कडक बंदोबस्तात साजरा होणार बैलपोळा, १०० जणांचे सुरक्षाबल तैनात, शांतता व सुव्यवस्थेसाठी २५ कमिट्या व ५० स्वयंसेवक

धडगाव l प्रतिनिधी

मनवाणी ता.धडगाव येथे कडक बंदोबस्तात बैलपोळा साजरा करण्यात येणार आहे. मनवाणी येथे साजरा होणारा बैलपोळा हा अवघ्या सातपुड्याचा उत्सव असून यासाठी पोलीस प्रशासन व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत बैलपोळ्यासाठी मनवाणीत युवक व जबाबदार व्यक्तींच्या २५ कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत. याशिवाय ५० स्वयंसेवकही नेमण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाकडून १०० जणांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

 

सर्जाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनवाणीत कोरोना कालावधी वगळता परंपरेनुसार बैलपोळा साजरी होत आला आहे. या परंपरेतच यंदाचाही बैलपोळाही साजरा होत आहे. या उत्सवासाठी मनवाणीत ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठकही घेण्यात आली.

 

या बैठकीत रामा वळवी, पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, गुलाबसिंग राहसे, गोपनीय शाखेचे पुष्पेंद्र कोळी यांच्यासह मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बैलांची मिरवणूक काढण्यासाठी एक बँड पार्टी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

तर अन्य नृत्य कार्यक्रमासाठी पारंपरिक ढोलची वाजवण्याचा निर्णय घेतला असून यातून संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. बैलांची मिरवणूक ही जि.प. शाळेपासून हनुमान मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. या उत्सवासाठी धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातून जनसमुदाय उपस्थित राहणार आहे.

 

या कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्व नियोजन केले आहे. या नियोजनानुसार १ पोलीस निरीक्षक, २ पोलीस उप निरीक्षक, ३५ पोलीस कर्मचारी तर गृहरक्षक दलाचे ६० कर्मचारी असा एकुण ९८ जणांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

 

त्यामुळे शांतता व सुव्यवस्था नियमांचे उल्लघन टळणार आहे. ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाच्या या निर्णयामुळे उत्सवात सहभागी होणार्‍या नागरिकांना सुरक्षेचा आधार मिळणार आहे.

 

आंतरराष्ट्रीय धावपटू भगतसिंगचा होणार सत्कार

असली ता.धडगाव येथील रहिवासी तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर धावण्याच्या शर्यतीत नंदुरबार जिल्हा व महाराष्ट्राचे नाव उंचावणारा भगतसिंग वळवी याचा सातपुड्याच्या वतीने शाही सत्कारही करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त मनवाणीच्या हनुमान मंदीरात आदल्या दिवसांपासूनच विविध पूजेचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. यासाठी तडवी काकड्या महाराज हे परिश्रम घेत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

स्थलांतर रोखण्यासाठी वृक्ष लागवड व वने संरक्षण आवश्यक : ॲड. सीमा वळवी

Next Post
स्थलांतर रोखण्यासाठी वृक्ष लागवड व वने संरक्षण आवश्यक : ॲड. सीमा वळवी

स्थलांतर रोखण्यासाठी वृक्ष लागवड व वने संरक्षण आवश्यक : ॲड. सीमा वळवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add