नंदुरबार l प्रतिनिधी

येथील रेल्वे रॅक पॉइंटला खा. डॉ. हिना गावित यांनी भेट देऊन पाहणी केली. पॉइंट वरील समस्यांचे निवारण करून येणाऱ्या अडचणी सोडविण्या संदर्भात त्यांनी आश्वासन दिले. तसेच आरसीएफ कंपनीकडून आलेल्या २६०० मॅट्रिक टन युरियाची पाहणी केली.
रॅक पॉईंट मुळे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध होईल व अडचणी येणार नाही असे खा. हिना गावीत यांचे आश्वासन दिले.यावेळी आरसीएफ कंपनीचे विपणन अधिकारी संदीप शिरसाठ यांनी रॅक पॉईंट सह परिसराची माहिती मान्यवरांना दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ.सुप्रिया गावित ,राजश्री वळवी , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, विभागीय कृषी अधिकारी प्रदीप लाटे, आरसीएफ कंपनीचे विपणना अधिकारी संदीप शिरसाठ, नगरसेवक चारुदत्त कळवणकर, प्रशांत चौधरी, जिल्हा परिषद सदस्य श्री.तडवी,
धडगाव येथील देवमोगरा बहुद्देशीय संस्था, तैय्याबिया फर्टिलायझर नंदूरबार, किसान ट्रेडर्स नंदूरबार यांचे प्रतिनिधी तसेच मोहन खानवाणी, सुभाष पानपाटील,भरत माळी, दुर्गेश राठोड, मिलिंद मोहिते, गोपी उत्तमाणी, डॉ. गायत्री पाटील, जवाहर जैन. यांच्यासह विविध मान्यवर व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.









