नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार व नवापूर अशा दोन ठिकाणाहून चोरट्यांनी दोन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील माळीवाडा येथील महेंद्र पांडूरंग माळी यांच्या मालकीची दुचाकी (क्र.एम.एच.३९ एएफ १६७५) माळीवाड्यातील किसन दादा नगरातून चोरट्याने चोरुन नेली.
याबाबत महेंद्र माळी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.प्रकाश अहिरे करीत आहेत.
तसेच नवापूर तालुकयातील आमपाडा येथील शैलेश मोन्या गावित यांच्या मालकीची दुचाकी (क्र.जी.जे.२६ जे २९६१) नवापूर शहरातील एका हॉटेलजवळून चोरट्याने चोरुन नेली. याबाबत शैलेश गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीीक अशोक मोकळ करीत आहेत.









