शहादा l प्रतिनिधी

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे के.व्ही.पटेल.कृषि महाविद्यालय, शहादातर्फे
राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने स्वातंत्र्योत्तर काळातील कृषी तंत्रज्ञानातील प्रगती या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.आॅनलाईन स्पर्धेत विद्यार्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यात प्रथम पारितोषिक- चेतन जगतराव देवरे (के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालय शहादा) रू.701 व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक – उमेश देविदास खत्री (कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा) रु. 501 व प्रमाणपत्र,तृतीय पारितोषिक- शुभम अशोक डुबे (डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय) रु. 301 व प्रमाणपत्र असा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आहे.
निबंध स्पर्धेचे आयोजन प्रा.डॉ.बी.सी.चौधरी यांनी केले.परीक्षक म्हणून प्रा.डी.एस.सूर्यवंशी यांनी काम पाहिले.स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील,उपाध्यक्ष जगदीश पाटील,सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल यांनी अभिनंदन केले आहे.









