नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . सातपुड्याचा दुर्गम भागात मका हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक असून सततधार पावसामुळे मका पीक लालसर पडून त्याची वाढ खुंटली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून कृषी विभागाच्या वतीने धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा धडगाव अक्कलकुवा मतदारसंघाच्या आमदार ॲड
के.सी.पाडवी यांनी केली आहे.
तसेच या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा यासंदर्भातील सर्व माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवावी त्यासाठी माजी मंत्री ॲड के सी पाडवी यांनी पाठपुरावा सुरू केला असून जिल्हा प्रशासनाला या संदर्भाचे निवेदन देण्यात आले आहे.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात या भागातील परिस्थिती अवगत करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन आणि राज्य सरकारने पुढे यावे अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येतील असा इशारा या वेळेस देण्यात आला आहे.