नंदुरबार l प्रतिनिधी
जि. प. शाळा धुळवदपाडा येथे शालेय विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश व शैक्षणिक साहित्य नंदुरबार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास मुख्याध्यापिका श्रीमती विद्यादेवी गिरासे यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शिक्षिका आशा पवार यांनी शाळेने आजपर्यंत राबवलेले विविध उपक्रम व घेत असलेले विद्यार्थी कौशल्य विकास उपक्रमांची माहिती देऊन सर्व मान्यवरांचे आभार मानले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र परदेशी, विस्तार अधिकारी एन.जे.पाटील, केंद्र प्रमुख.एल.जी. देसले, माजी सरपंच सुरेश पाडवी, रेवंता वळवी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांत्या वळवी व सदस्य, पोलिस पाटिल मोगरा वळवी, ग्रामसेवक एम.आर. भोये, मुख्याध्यापिका विद्यादेवी गिरासे, शिक्षिका श्रीमती. आशा पवार, अंगणवाडी सेविका सुनिता पाडवी, मदतनीस चंदना पाडवी, मदतनीस संगिता वळवी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.