Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ, अनरद येथे एकाच रात्री तब्बल दहा ठिकाणी घरफोडी

team by team
August 21, 2021
in क्राईम
0
जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ, अनरद येथे एकाच रात्री तब्बल दहा  ठिकाणी घरफोडी
शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील अनरद येथे एकाच रात्री तब्बल दहा  ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाल्याने गावात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . याबाबत सारंगखेडा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली असून याबाबत पोलिसांनी ठोस उपायोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार , दि .१८ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शहादा तालुक्यातील
अनरद येथील सवतानगर मध्ये राहणाऱ्या राजू शिवदास कोळी  यांच्या आई राहत असलेल्या घराच्या मागील बाजूच्या दरवाज्याने घरात प्रवेश करून पत्र्याच्या पेटीत ठेवलेली ११ हजाराची रोख रक्कम चोरून नेल्याची फिर्याद राजू कोळी यांनी सारंगखेडा पोलिसात दिली . त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर याच रात्री चोरट्यांनी कल्पना रमेश माळी हे लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असता याची संधी साधत घराचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटामधील कपडे व सामान अस्ताव्यस्त करून पाच भार चांदी व दोन ग्रॅम सोने , तसेच देवाऱ्यातील देवदेखील चोरून नेल्याचे समजते . तसेच इतर काही घरामध्ये देखील चोरट्यांनी हातसफाई केल्याचे समजते .कैलास रमेश पाटील यांच्या घरातदेखील चोरीचा प्रयत्न केला असता यावेळी त्यांना वेळीच जाग आल्याने त्यांनी चोरट्यांना हटकण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्याकडील हत्याराने कैलास पाटील यांना जखमी केल्याने त्याच्या डोक्यावर तीन ते चार टाके पडल्याची माहीत मिळाली आहे . यावेळी त्यांनी सांगितले की , सदर चोरटे तीन ते चार जण असून त्यांच्याकडे हत्यारदेखील आहे . याबाबत कैलास पाटील यांच्या फिर्यादीवरून सारंगखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा करण्यात आला आहे .नंदुरबार जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाली असून याबाबत पोलिसांनी ठोस उपायोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील लसीकरणासाठी तालुका स्तरावर उपलब्ध इतक्या लस उपलब्ध

Next Post

नवापाडा – कुंभारपाडा रस्त्यावर मोटारसायकल घसरल्याने युवक ठार

Next Post

नवापाडा - कुंभारपाडा रस्त्यावर मोटारसायकल घसरल्याने युवक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add