नंदुरबार । प्रतिनिधी
शहरातील अहिल्याबाई विहिरीजवळ असलेल्या बंद पडक्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 11 हजार रुपये किंमतीचे घरगुती साहित्य चोरुन नेले.
नंदुरबार येथील तेजस राजेंद्रभाई मेहता हे सुरत येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे नंदुरबार शहरातील अहिल्याबाई विहिरीजवळ पडके घर असून ते बंद आहे. यशा घराचा दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
तसेच आतील रुमची लोखंडी खिडकीची सळई काढून रुममध्ये असलेले 10 पितळाचे पातले, 50 ग्लास, 7 परात, 6 खुर्पे-चमचे, 7 पितळी ताट व 2 लोखंडी पेट्या असे एकूण 11 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेले. याबाबत तेजस मेहता यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.दिनकर गुले करीत आहेत.