नंदुरबार l प्रतिनिधी
येथील रक्त फाऊंडेशन एक वटवृक्ष महाराष्ट्र राज्य नंदुरबार युनिट आणि नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटना यांच्या विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी रक्तदान उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी 75 दात्यांनी रक्तदान करुन देशभक्तीपर प्रेम व्यक्त करुन आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्याचा 75 वा महोत्सव आणि रक्तदान देखील 75 दात्यांनी केल्याने हा उपक्रम कौतुकास्पदपणे राबविण्यात आला.
नंदुरबार येथील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. रक्तदानाची सुरुवात साप्ताहिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सतिश गोसावी, उपाध्यक्ष दिलीप बडगुजर यांनी रक्तदान करुन केली.
भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव रक्तदानाने साजरा करीत आदर्शदायी उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी शितल पटेल, नागसेन पेंढारकर, जितेंद्र जैन, अजय देवरे, डॉ. अजय शर्मा,अकिब धोबी, दीपक साळी, विक्रांत सोनवणे, राहुल राजपूत, अतुल शर्मा , प्रशांत तांबोळी, रितेश पटेल, अब्दुल शेख, पवन कन्हेरे तसेच साप्ताहिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सतीश गोसावी, उपाध्यक्ष दिलीप बडगुजर, पत्रकार जगदीश सोनवणे,
जितेंद्र जाधव, ज्ञानेश्वर गवळे, हिरालाल मराठे, प्रवीण चव्हाण, आफिक मिर्झा, सुभाष राजपूत, मनोज समशेर, सुबोध अहिरे, शैलेंद्र ईशी तसेच रक्तसंकलनासाठी नंदुरबार जनकल्याण ब्लड बँकेचे डॉ. लालचंदानी, आकाश जैन, मनीष पवार, प्रकाश भोई, सोनिया गावित, अंजली वळवी, राजा वळवी, शेखर पाटील, मदतनीस गोरख भिल आदी उपस्थित होते.








