नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील गाझी नगर येथील शेख नुमेर अहमद मजरुद्दीन यांचा विश्वास संपादित करुन वत्सल भरतभाई खत्री (रा.वलसाड, गुजरात) हा कॅमेरा व कॅमेऱ्याची लेन्स घेवून गेला. मात्र अद्यापपर्यंत ५२ हजार ९९५ रुपये किंमतीचा कॅमेरा व १८ हजार रुपये किंमतीचे कॅमेऱ्याचे लेन्स असे एकूण ७० हजार ९९५ रुपये किंमतीचा कॅमेरा व लेन्स न आणून देता फसवणूक केली.
याबाबत शेख नुमेर अहमद मजरुद्दीन यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात वत्सल खत्री याच्याविरोधात भादंवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर करीत आहेत.








