Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बसमध्ये महिलेची पोत लंपास करणाऱ्या भामट्यास अटक

team by team
August 19, 2021
in क्राईम
0
नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा बसस्थानकावर धुळे ते कालीबेल बसमध्ये महिलेची पोत तसेच एका इसमाचे रोकड असणाऱ्या पाकीट लांबविण्याचा  प्रयत्न करणाऱ्या संशयितास अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
 याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , शहादा येथील बसस्थानकावर मंगळवारी दुपारी धुळे ते कालीबेल या बस बसमध्ये प्रवासी चढत असताना अज्ञात व्यक्ती खिसे कापून चोरी करत असल्याचे समजल्याने पोलीसांशी संपर्क करुन बोलाविण्यात आले.पोलिस तात्काळ बसस्थानकात आल्यावर चोर पळण्याच्या तयारीत असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी बसस्थानक आवारात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली . या अनुषंगाने मंगळवारी दुपारी धुळे ते कालीबेल ( बस क्रमांक एम.एच .१४ बीटी २१ ९ ४ ) या कालीबेलकडे जाण्यासाठी बसस्थानक आवारात थांबले असता प्रवासी वर्ग चढत असताना हीच संधी साधून एकजण प्रवाशांच्या खिसे कापू लागल्याचे लक्षात येताच पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना माहिती दिली . यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश वाघ , पोलिस कर्मचारी मेहरसिंग वळवी , अमोल राठोड , जगदीश पाटील , राकेश मोरे , दिनकर चव्हाण हे तातडीने शहादा बस स्थानकावर पोहोचले . चोराला पोलीस आल्याचे कळताच संशयित बस स्थानकाच्या भिंतीवरून फरार होण्याचा प्रयत्न करीत असतात पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केली .  व त्याच्याकडून तीन पाकीट जप्त करण्यात आली . याबाबत रंजना धुडकू जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयिताविरोधात शहादा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान , संशयित खिसेकापूला अटक करण्यात आल्याने प्रवासी वर्गामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

नवजीवन एक्सप्रेसच्या धडकेत एकाचा मृत्यू

Next Post

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

Next Post
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add