Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी शेतकरी,जमीन मालकाने अर्ज सादर करावे

team by team
August 11, 2022
in राज्य
0
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान  योजनेसाठी शेतकरी,जमीन मालकाने अर्ज सादर करावे

नंदुरबार l प्रतिनिधी

भूमिहिन दारिद्ररेषेखालील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेतंर्गत अनुसूचित जातीच्या दारिद्ररेषेखालील भूमिहिन कुटुंबांना चार एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) देण्याची योजना सामाजिक न्याय विभागातर्फे 100 टक्के अनुदानित राबविण्यात येते. या योजनेसाठी जमीन विक्रीसाठी इच्छुक शेतकरी, जमीन मालकांनी 30 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्‍त देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्रय रेषेखालील कुटूंबाला 4 एकर कोरडवाहू (जिरायत) जमीन किंमत कमाल 5 लाख प्रती एकर किंवा 2 एकर ओलीताखालील (बागायती) जमीन किंमत कमाल 8 लाख प्रती एकर जमीन उपलब्ध करुन देण्यात येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भूमिहीन असावा, लाभार्थ्यांकडे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला दाखला असावा. लाभार्थ्यांचे किमान वय 18 वर्ष व कमाल 60 वर्ष असावे.विधवा किंवा परितक्या असल्याचा दाखला, अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचार ग्रस्तांना प्राधान्य देण्यात येईल.

 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जमीन विक्री प्रस्तावासोबत जोडावयाची कागदपत्रे : जमिनीचा सातबारा उतारा तसेच मागील पाच वर्षांचे फेरे असल्याची नोंद उतारा, 8अ दाखला, विहीत नमुन्यात 100 रुपये बाँड पेपरवर शपथपत्र, गाव नकाशा, निर्विवाद प्रमाणपत्र दुय्यम निबंधक श्रेणी (तलाठी ), चतु;सिमा, मुल्याकंन प्रमाणपत्र, जमीन संपादित केली नसल्याबाबत तलाठी यांचे प्रमाणपत्र, बोजा प्रमाणपत्र, मध्यवर्ती सहकारी बँक,राष्ट्रीयकृत बँक, भूविकास बँक, पतसंस्थाचे बेबाकी प्रमाणपत्र, शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याचा टाचन नकाशा, शेतजमीन विक्री बाबत नाहरकत प्रमाणपत्र, नोट कॅम फोटो, मोका पाहणी, मागील तेरा वर्षाचे फेरफार इत्यादी कागदपत्र जोडून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ’ स्पर्धेत सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Next Post

मोलगी बाजारात एकास जीवेठार मारण्याचा प्रयत्न

Next Post
मोलगी बाजारात एकास जीवेठार मारण्याचा प्रयत्न

मोलगी बाजारात एकास जीवेठार मारण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add