Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ’ स्पर्धेत सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

team by team
August 11, 2022
in राज्य
0
माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ’ स्पर्धेत सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ’ स्पर्धा आयोजित केली असून जास्तीत जास्त नागरिक व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही जपत आहे.

याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव सजावट-देखावा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच वैयक्तिकरीत्याही नागरिकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळे प्रबोधनपर देखावे साकारतात, तसेच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. सार्वजनिक मंडळांच्या देखाव्यांच्या माध्यमातून आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीद्वारे सामाजिक संदेशदेखील दिले जातात. या स्पर्धेचा विषय ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ हा आहे. मताधिकार हा 18 वर्षांवरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे.

 

त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून मंडळांना देखाव्यांच्या माध्यमातून; तर घरगुती पातळीवर गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर आपल्या देखाव्या-सजावटीतून जागृती करून लोकशाही समृद्ध करता येईल.

 

गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा 2022 साठी प्रवेश अर्ज 31 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार आहे. स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट 2022 ते 9 सप्टेंबर 2022 या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल. सदर स्पर्धा वैयक्तिक (घरगुती गणेशोत्सव सजावट) आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अशा दोन्हींसाठी असून घरगुती स्पर्धेत साहित्य पाठविण्यासाठी मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही या विषयाला अनुसरून केलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावटीचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत.

 

प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त 5 एम.बी साईजचा व जेपीजी फॉरमॅटमध्येच असावा. मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही याविषयीच्या देखाव्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडावी. ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) आणि फोटो गूगल अर्जावर जोडताना, त्यावर स्पर्धकाचे नाव येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. चित्रफितीला आवाजाची जोड (व्हाइस-ओव्हर) देऊ शकता. ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त १०० एम.बी असावी. तसेच ही ध्वनिचित्रफित एम.पी 4 फॉरमॅटमध्ये असावी आणि ती एक ते दोन मिनिटांची असावी.

 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साहित्य पाठविण्यासाठी मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही या विषयाला अनुसरून केलेल्या देखाव्याचे विविध कोनांतून काढलेले पाच फोटो पाठवावेत. प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त 5 एमबी साइजचा व जेपीजी फॉरमॅटमध्येच असावा. गणेशोत्सव मंडळामध्ये केलेल्या मताधिकार,

 

लोकशाही याविषयीच्या देखाव्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडावी.ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) आणि फोटो गूगल अर्जावर जोडताना, त्यांवर मंडळाचे किंवा मंडळातील कुणा व्यक्तीचे नाव, लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त 500 एम.बी असावी. ही ध्वनिचित्रफीत एम.पी 4 फॉरमॅटमध्ये असावी आणि 10 मिनिटांपेक्षा अधिक असू नये.गणेशोत्सव मंडळाने सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गूगल अर्जावर स्पर्धक म्हणून गणेशोत्सव मंडळाचे नाव लिहून, त्यानंतर डॅशचे चिन्ह
(-) देऊन अध्यक्ष किंवा सचिव यांचे नाव लिहावे (उदा. घोलाईदेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – मंदार मोरे) आणि पुढे त्याच व्यक्तीचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक लिहावा.गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिव यांची स्वाक्षरी असलेले पत्र गूगल अर्जावर जोडावे.

 

पत्राचा नमुना गूगल अर्जावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्पर्धकांनी आपले फोटो आणि ध्वनिचित्रफीत https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7 या गूगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावेत. ज्या स्पर्धकांना फोटो किंवा ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर), ९९८७९७५५५३ (तुषार पवार) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवावा.

 

बक्षिसांचे स्वरूप : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बक्षिसांचे स्वरूप प्रथम क्रमांक 51 हजार, द्वितीय 21 हजार, तृतीय 11 हजार असून उत्तेजनार्थ 5 हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे असणार आहे. घरगुती गणेशोत्सव सजावटीसाठी बक्षिसांचे स्वरूप प्रथम क्रमांक 11 हजार, द्वितीय 7 हजार, तृतीय 5 हजार तर उत्तेजनार्थ 1 हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे असणार आहे.

 

सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. आलेल्या देखाव्या-सजावटींमधून सर्वोत्तम देखावे-सजावटी निवडण्याचा तसेच स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल. निवडणूक कार्यालयात कार्यरत अधिकारी, कर्मचारी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, मात्र त्यांच्या साहित्याचा बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल.स्पर्धेची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर https://ceo.maharashtra.gov.in/ उपलब्ध आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे झोंबाझोंबी करणार्‍या दोघांविरूध्द गुन्हा

Next Post

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी शेतकरी,जमीन मालकाने अर्ज सादर करावे

Next Post
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान  योजनेसाठी शेतकरी,जमीन मालकाने अर्ज सादर करावे

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी शेतकरी,जमीन मालकाने अर्ज सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add