Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रंगावली धरणाची उंची वाढनार नाही,अफवांवर विश्वास ठेवू नये तहसीलदार मंदार कुलकर्णी यांचे आवाहन, चुकीचे मॅसेज प्रसारीत करणाऱ्यावर कारवाईची नागझरी ग्रामस्थांची मागणी

team by team
August 18, 2021
in आरोग्य
0
रंगावली धरणाची उंची वाढनार नाही,अफवांवर विश्वास ठेवू नये तहसीलदार मंदार कुलकर्णी यांचे आवाहन, चुकीचे मॅसेज प्रसारीत करणाऱ्यावर कारवाईची नागझरी ग्रामस्थांची मागणी
नंदुरबार ! प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील नागझरी गावातील नागरिकांनी नागझरी येथील रंगावली मध्यम प्रकल्प धरणाची उंची वाढविण्यात येणार असून त्यामुळे मोठ्या माणात नागरिकांना विस्थापित केले जाणार असल्याचे सोशल मीडियावर मॅसेज बाबत खुलासा करावा. व अफवा पसरवणाऱ्या विरूद्ध कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,नागझरी ता.नवापूर ग्रामस्थ आपणाकडे विनती करतो की, बी.टी.पी , तालुका अध्यक्ष राहुल गावीत यांनी सोशल मीडियावरील  व्हॉटसअपवर इंडिजिनिअस म्हणून फोटो व माहिती प्रदर्शित केलेली आहे . यात नागझरी येथील रंगावली धरणाची उंची वाढविली जाणार आहे.व त्यामुळे नागझरी गांव देखील उठविले जाणार आहे . गावाचा संपर्क कायमचा तुटणार आहे.अशी  माहिती प्रकाशित केलेली आहे . या संदेशामुळे गावातील लोक भयभीत झालेले आहेत . तरी  याबाबत योग्य ती चौकशी होऊन राहुल गावीत यांनी प्रकाशित केलेला संदेश योग्य आहे की लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी सदरचा संदेश टाकलेला  आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी. सदरची माहिती चुकीची निघाल्यास संबंधित व्यक्तीवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा नोंद करण्यात यावाअशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर ग्रामस्थ करसन लालजी गावीत, हरिष देवल्या गावीत, रविंद्र बारक्या गावित, कर्मा गावजी गावीत, संदिप पंडीत गावीत, प्रकाश कालिदास गावीत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान नवापूर तालुक्यातील नागझरी गावातील नागरिकांनी निवेदन दिले असून त्या निवेदनात ग्रामीण भागात सोशल माध्यमांमध्ये पुढीलप्रमाणे अफवा पसरत असल्याचे नमूद केले आहे . नागझरी येथील रंगावली मध्यम प्रकल्प धरणाची उंची वाढविण्यात येणार असून त्यामुळे मोठ्या माणात नागरिकांना विस्थापित केले जाणार असल्याचे तसेच सदर भागाचा संपर्क कायमचा तुटणार असल्याचे सदर संदेशात नमूद करण्यात आले आहे . सदरचा संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यामुळे नागरिक भयभीत झाले असल्याचे नमूद आहे . तथापि सदरचा व्हायरल झालेला संदेश चुकीचा असून रंगावली धरणाची उंची वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव शासन स्तरावर सुरु नाही . तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यातील युवासेनेचे पदाधिकारी जाहीर, जिल्हा युवा अधिकारी म्हणून अर्जुन मराठे व ललित जाट यांची नियुक्ती

Next Post

पैसे मागितल्याचा राग आल्याने एकाचा खून, एकास अटक

Next Post
पैसे मागितल्याचा राग आल्याने एकाचा खून, एकास अटक

पैसे मागितल्याचा राग आल्याने एकाचा खून, एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026
त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

October 31, 2026
गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

October 31, 2026
दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

October 31, 2026
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add