नंदुरबार l प्रतिनिधी
विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त भारतीय किसान सेना,भिलीस्थान लायन सेना व कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालयाच्या वतीने बिलाडी ता.नंदुरबार मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो ग्रामस्थांनी शिबिराच्या लाभ घेतला.
नंदुरबार तालुक्यातील बिलाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नेत्र तपासणी शिबीराचे उद्घाटन भिलिस्थान लायन सेनेचे प्रदेशाध्यक्ष पंडित तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, भिलिस्थान लायन सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष नेरकर ,किसान सेना भटके जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव, शहराध्यक्ष राजेंद्र माळी ,तालुकाध्यक्ष बिंदास गावित ,भिलिस्थान लायन सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकित वळवी, धुळे जिल्हाध्यक्ष सुखमा सोनवणे , बिलाडी जि.प शाळेचे मुख्याध्यापक अनिल हिरे,संगीता वसावे,रवींद्र मोरे,आधार ठाकरे,रविदास वळवी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कांतालक्ष्मी हॉस्पिटलचे डॉ.गोविंद वैद्य यांनी ग्रामस्थांची तपासणी केली त्यांना सहाय्य पाडवी यांनी केले.
विश्व आदिवासी गौरवदिवसनिमित्त आयोजित शिबिराप्रसंगी बिलाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भारतीय किसान सेनेचे प्रदेश प्रवक्ते अर्जुन पवार यांनी केले.