नंदुरबार l प्रतिनिधी
खा. डॉ.हिना विजयकुमार गावित यांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात त्यांच्या नाकाच्या हाडाला फ्रॅक्चर झाले असून पुढील उपचारासाठी मुंबई येथे रवाना झाले असून त्यांच्यासह चार कार्यकर्तेही जखमी झाले आहेत.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खा. डॉ. हिना गावित यांच्या गाडीचा अपघात झाल्याने खा. हिना गावित किरकोळ जखमी झाल्या असून, शहरात 9 ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिवस साजरा केला जात असल्याने त्या पूर्वसंध्येला,
शहरातील विविध आदिवासी संघटनांच्या युवकांतर्फे मोटर सायकल रॅली निघत असतात, त्या मोटरसायकल रॅलीचे उद्घाटन शहरातील कोरीट नाका येथून शुभारंभ करण्यात आले,
त्यानंतर खा. डॉ. हिना गावीत या एका खाजगी पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी कार्यकर्त्यांसोबत जात असताना त्यावेळी शहरातील गुरव चौक भागात येथे अचानक दुचाकीस्वार त्यांच्या वाहनासमोर आल्याने खा. हिना गावित त्यांची गाडी झाडावर आदळली, त्यामध्ये खा. डॉ. हिना गावित यांच्या नाकाच्या हाडावर लागल्याने फॅक्चर झाले असल्याचा डॉक्टरांकडून सांगण्यात आले असून,
खा. डॉक्टर हिना गावित त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते सुभाष पानपाटील यांना पायाला दुखापत झाली आहे, तर महेंद्र पटेल यांच्या देखील हाताला दुखापत झाली आहे, आणि जीतू पाटील, प्रतिक जैन यांना किरकोळ दुखापत झाली आहे,
मात्र समोर आलेल्या दुचाकीवर असलेले महिला आणि पुरुष जखमी झालेले आहेत. दुखापत झाल्याने त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, त्याच बरोबर खा. हिना गावित आणि कार्यकर्त्यांची देखील प्रकृती स्थिर आहे,
मात्र पुढील उपचारासाठी डॉ.हिना गावित यांना मुंबई येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात आलेला असून संध्याकाळी रेल्वेने उपचारासाठी मुंबई येथे निघाले असल्याची माहिती स्वतः खा. डॉ. हिना गावित यांनी दिली.