नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येेथील एका कार्यक्रमाला जात असतांना एका दुचाकीस्वार महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात खा.डॉ.हिना गावीत यांची गाडी दुभाजकावर आदळुन अपघात झाल्याची घटना घडली आहे.यात खा.डॉ.हिना गावीत यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
याबाबत प्राथमीक माहिती अशी कि,आज दि.७ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजेच्या स्ाुमारास नंदुरबार शहरात असलेल्या एका कार्यक्रमाल जात असतांना शहरातील करण चौफुली जवळ असलेल्या ॲन्टी करप्शनच्या ऑफिस जवळ खा.डॉ.हिना गावीत यांची गाडी आली असता अचानक एक दुचाकीस्वार महिला आली.तीला वाचवण्याच्या प्रयत्नात असतांना गाडी दुभाजकावर जावुन धडकली.
यात खा.डॉ.हिना गावीत , सुभाष पानपाटील यांना किरकोळ दुखापत झाली.अपघाता नंतर खा.डॉ.हिना गावीत यांच्यावर शहरातील तुलसी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. खा.डॉ.हिना गावीत यांना किरकोळ दुखापत झाली आहे.आता त्यांच्यी प्रकृती चांगली आहे.