तळोदा l प्रतिनिधी
कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळोदा येथील विद्यार्थी विकास विभाग , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या विद्यार्थी विकास विभाग व सातपुडा ग्रीन व्हॅली व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात बांबू राख्या व बांबूच्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले .
सदर कार्यक्रमासाठी माजी मंत्री पद्माकर वळवी आणि काॅलेज ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष भरत बबनराव माळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस .एन .शर्मा, समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा वसावे , निशा वळवी आणि आणि सिनेट सदस्य डॉ.एस .आर गोसावी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जे एन शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ महेंद्र माळी यांनी केले . तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा पंकज सोनवणे व इतर स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण असे सहकार्य केले .
सदर कार्यक्रमात माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना पर्यावरणाच्या संरक्षणासाठी बांबू हा अतिशय महत्त्वाचा आहे त्यासाठी बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड केली पाहिजे असे त्यांनी मत व्यक्त केले तसेच बांबूंच्या रोपांचे व इतर वृक्षांचे एकूण 2000 रोप उपलब्ध करून दिलीत तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एन शर्मा यांनी अध्यक्षीय भाषण करत असताना बांबू हे शेतकऱ्यांसाठी व पर्यावरणासाठी महत्वाचे झाड म्हणून त्याचा उल्लेख केला बांबू पासून अनेक कलाकृतीच्या वस्तू तयार करता येऊ शकतात आणि त्यामुळे शेतकरी कुटुंब स्वावलंबी बनू शकतो असा त्यांनी उल्लेख केला.
सदर कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक रोप देण्यात आले आणि त्याच्या संवर्धनासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा ए डी धोंडगे ,डॉ आर डी मोरे व इतर प्राध्यापक ही उपस्थित होते.
या कार्यक्रमात बांबू पासून तयार झालेल्या विविध वस्तू म्हणजे सोपा, टीपॉय, शोच्या वस्तू ,बांबूच्या राख्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात बांबूंच्या राख्यांसाठी प्रतिसाद दिला.