नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे असे आदेश शासनामार्फत सर्व भागांना देण्यात आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमात लोकांचा जास्तीत जास्त सहभाग आणि जागरुकता सुनिश्चित करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे दि. 8 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी.शेखर पाटील यांचे हस्ते महावीर हायस्कुल, डोंगरगांव रोड, शहादा येथे वृक्ष लागवड करुन वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
‘पर्यावरण संवर्धन’ ही काळाची गरज असल्याने पर्यावरणाचा -हास होऊ नये व निसर्गाचे संरक्षण
व्हावे यासाठी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे संकल्पनेतून 75 हजार वृक्षारोपण करण्याचे लक्ष्य असून यातील पहिला टप्पा म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील 12 पोलीस ठाणे व पोलीस मुख्यालय तसेच शाळा / महाविद्यालयाच्या आवारात व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत 25 हजार वृक्ष लागवड केलेली आहे. तसेच उर्वरीत 50 हजार वृक्ष लागवड 15 ऑगस्ट 2022 रोजी पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात येईल.
दि. 8 ऑगस्ट 2002 रोजी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांचे उपस्थितीत शहादा शहरातील महावीर हायस्कुल व डोंगरगांव शिवारात नंदुरबार जिल्हा पोलीस लामार्फत 5000 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसात कोविडचा प्रभाव कमी झाल्यानंतर साजरे झालेले रमजान इंद शिवयंती, विविध महापुरुषांच्या जयंती, रामनवमी तसेच आगामी काळात साजरे होणारे मोहरम, विश्व आदिवासी दिन तसेच गणेशोत्सव काळात डी.जे. व डॉल्बी साउंड सिस्टीम न वाजविता] पारंपारिक वाद्य वाजवावे असे आवाहन प्रशासनाने केले होते.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळांनी प्रशासनाच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत पारंपारिक वाद्य वाजवून नंदुरबार जिल्हा डी. जे. व डॉल्बी साउंड सिस्टीममुक्त केला म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकान्यांचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी. जी. शेखर पाटील यांचे हस्ते प्रशंसापत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे दि. 8 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता महावीर हायस्कुल, शहादा व डोंगरगांव येथे जास्तीत जास्त नागरिक व विद्याथ्र्यांनी उपस्थित राहवे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे.








