नंदुरबार l प्रतिनिधी
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पावरा यांच्यासह भाजपा धडगाव तालुका उपाध्यक्ष मानसिंग पावरा,श्यामसिंग पावरा,नटवर पावरा यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी भाजप पदाधिकारी यांचे पक्षात स्वागत केले.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा सर्व धर्मभाव जपणारा पक्ष असून तुमच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी कटीबद्ध आहेत असा उपस्थितांना विश्वास दिला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष नितीन जगताप,तालुकाध्यक्ष प्रदिप पाटील,युवा नेते रविंद्र वळवी,जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी,सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे,सेवादल जिल्हाध्यक्ष रविंद्र जावरे,युवक तालुकाध्यक्ष सुरेश वळवी,निलेश चौधरी, रुपेश जगताप,उपस्थित होते.








