नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा शहरातील संजय नगरात चोरीच्या दोन दुचाकी बाळगल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा शहरातील संजय नगरातील एजाज शेख चॉँद शेख याच्या घरासमोर ९० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी लावलेल्या होत्या.
सदर दुचाकींबद्दल विचारणा केली असता तसेच कोणाच्या मालकीच्या आहेत याबाबत विचारणा केली असता सांगता आले नाही. तसेच कागदपत्रांबाबत विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिले. याबाबत पोहेकॉ.मुकेश तावडे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात संशयित एजाज शेख चॉँद शेख याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत करीत आहेत.








