नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या आदेशान्वये राज्यातील सर्व केंद्रांमध्ये दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी निपुण भारत अंतर्गत एकदिवसीय शिक्षक उद्बोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाच्या सुलभनासाठी जिल्हास्तरावर दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी उद्बोधन सत्र आयोजित करण्यात आले होते.
या उद्बोधन सत्रात प्रत्येक तालुक्यातील चार तज्ञ केंद्रप्रमुख व शिक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले सदर तज्ञ सुलभक दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी तालुकास्तरावर प्रशिक्षण देणार आहेत. आज संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय उद्बोधन सत्राचे उद्घाटन डॉ. जगराम भटकर, प्राचार्य ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
सदर प्रशिक्षण प्रास्ताविक निपुण भारत जिल्हा नोडल अधिकारी श्री रमेश चौधरी वरिष्ठ अधिव्याख्याता यांनी केले .सदर प्रशिक्षणास सुलभक म्हणून रमेश चौधरी, वरिष्ठ अधिव्याख्याता, डॉ.राजेंद्र महाजन अधिव्याख्याता, डॉ. वनमाला पवार अधिव्याख्याता, सुभाष वसावे अधिव्याख्याता, संदीप पाटील तज्ञ शिक्षक , अनंत सूर्यवंशी तज्ञ शिक्षक यांनी कार्य केले. सदर प्रशिक्षणास जिल्ह्यातील 24 शिक्षक उपस्थित होते. सदर सत्राच्या शेवटी सामूहिक निपूण प्रतिज्ञा घेण्यात आली .सदर सत्राचे सूत्रसंचालन सुभाष वसावे यांनी तर प्रशिक्षण यशस्वीतेसाठी अनिल सोनवणे यांनी परिश्रम घेतले.








