नंदुरबार l प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे 75 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प,पहिल्या टप्प्यात 25 हजार वृक्षारोपण पुर्ण करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे असे आदेश शासनामार्फत सर्व विभागांना देण्यात आले आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमात लोकांचा जास्तीत जास्त सहभाग आणि जागरुकता सुनिश्चित करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे दि. 22 जुलै 2022 रोजी पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, डॉ.बी.जी.शेखर पाटील यांचे हस्ते वृक्ष लागवड करुन वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.
सदर कार्यक्रमास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार सचिन हिरे, पोलीस उप-अधीक्षक (मुख्यालय), नंदुरबार विश्वास वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
‘पर्यावरण संवर्धन’ ही काळाची गरज असल्याने पर्यावरणाचा -हास होऊ नये व निसगांचे संरक्षण व्हावे यासाठी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे 75 हजार वृक्षारोपण करण्याचे लक्ष असून यातील पहिला टप्पा म्हणून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील 12 पोलीस ठाणे व पोलीस मुख्यालय तसेच शाळा / महाविद्यालयाच्या आवारात व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत 25 हजार वृक्ष लागवड केलेली आहे. तसेच 15 ऑगस्ट 2022 रोजी पर्यंत 75 हजार वृक्षलागवड नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात येईल.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे लावण्यात येणारी 75 हजार रोपे उपलब्ध करण्यात आलेले असून त्यांचे योग्य प्रकारे नियोजन व आखणी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत, शाळा / महाविद्यालय, शासकीय पडीक जागेवर व इतर ठिकाणी सदरचे वृक्षारोपण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून या मोठ्या प्रमाणावर केलेल्या वृक्षलागवडीमुळे नागरीकांनी याबाबत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अभिनंदन करुन कौतुक केले आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या 75 हजार वृक्षारोपण कार्याक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग नोंदविलेला आहे.
भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या घरावर भारतीय राष्ट्रध्वज लावून हर घर तिरंगा, अमृत महोत्सव दीड तसेच वृक्षारोपण या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.