नंदुरबार ! प्रतिनिधी
तळोदा शहरातील चिनोदा चौफुलीवर चोरीचे मोबाईल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक करत ६३ हजार ५०० रुपये किमतीचे ९ मोबाईल हस्तगत केले.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा शहरातील चिनोदा चौफुलीवर दिपक सतिलाल पिंपळे व दिनेश बयसिंग माळी हे त्यांच्या कब्जात चोरलेले किंवा लबाडीने मिळविलेले ६३ हजार ५०० रुपये किमतीचे ९ मोबाईल फोन मिळून आले. त्यांना मोबाईल बाबत विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यांना मोबाईल खरेदीच्या पावत्या मागितल्या असता त्यांनी त्या दाखविण्यास असमर्थता दाखविली म्हणून पोना बापु गोबा बागुल यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात दिपक सतिलाल पिंपळे रा . बोरद . ता . तळोदा, दिनेश बयसिंग माळी रा . मोड ता . तळोदा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास पोह देविदास वाडीले करीत आहेत.