नवापूर | प्रतिनिधी
तालुक्यातील खरबर्डी येथे बेवारस स्थितीत आढळलेल्या आयशर वाहनामध्ये सुमारे सव्वा तीन लाखाचे मोहा प्रजातीची लाकडे आढळून आली . नवापूर येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर लाकूड वाहनासह जप्त केले आहे .
येथील वनक्षेत्रपालांना मिळालेल्या बातमीवरून गुप्त तालुक्यातील खरबर्डी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वनविभागाने सापळा रचला . संशयित वाहन क्रमांक ( एमएच १८-८९ ४२ )बेवारस स्थितीत दिसले .
सदर वाहनाजवळ जाऊन पाहणी केली असता वाहनात मोहा प्रजातीची लाकडे कटर मशिनच्या सहाय्याने कापून भरलेले दिसले . आयशर वाहन ( क्र . एमएच १८-८९ ४२ ) मालासह ( मोहा जळाऊ ) वाहन जप्त करून विक्री आगार नवापूर येथे आणुन जमा करण्यात आले . लाकुड भावानुसार किंमत लाख जप्त मालाची बाजार अंदाजित ३ ते ३.२० एवढी आहे .
सदर कार्यवाही वनक्षेत्रपाल अवसरमल , स्नेहल वनपाल सुनीता पाटील , ‘ वनरक्षक कमलेश वसावे , वाहन चालक दिलीप गुरव यांच्या पथकाने केली . पुढील तपास वनपाल खेकडा करित आहेत . वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १ ९ २६ वर संपर्क करावा , असे आवाहन वनविभागाने केले आहे .








