नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा- नंदुरबार रस्त्यावरील नळगव्हाण फाटयाजवळ ट्रॅक्टरवरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा- नंदुरबार रस्त्यावरील नळगव्हाण फाटयाच्या फर्ची पुलाजवळ राहुल पिसा वळवी याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्र.एम.एच.३९-ए.डी.९४४२) हे भरधाव वेगाने चालवून घेवून जात असतांना ट्रॅक्टरचे उजवे चाक खड्डयात जावून ट्रॅक्टर उधळले गेले.
यात ट्रॅक्टर वरून पडल्याने कांतीलाल बिरब्या वळवी (२८) रा.अस्तंबा (ता.धडगांव) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कांडया पिसा वळवी रा.अस्तंबा (ता.धडगांव) यांच्या फिर्यादीवरून राहुल पिसा वळवी रा.अस्तंबा ता.धडगांव याच्या विरूध्द तळोदा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४ (अ) २७९ मोटरवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि अविनाश केदार करीत आहेत.








