नंदुरबार । प्रतिनिधी
खा . डॉ . हीना गावित यांच्या प्रयत्नाने नवापूर येथील प्रवेशद्वारावर वेहीकुलर अंडर पास मंजूर करण्यात आला आहे .
नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा . डॉ . गावित यांच्या हीना प्रयत्नाने राष्ट्रीय महामार्ग – ६ वरील प्रवेशव्दारावर नवापूर वेहीकुलर अंडर पास ( VUP ) ची मागणी ना . नितीन गडकरी यांनी मंजूर केली आहे. त्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडुन लवकरच सुरु होणार आहे .
सदर काम मंजुर करण्यासाठी खा . डॉ . हीना गावित यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे . सदर Vehicular Under Pass चे काम मंजूर केल्यामुळे खा.डॉ. गावित यांचे नवापुर शहर तसेच तालुक्यातील जनतेने आभार मानले आहे .








