नंदुरबार l प्रतिनिधी
दुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील काल्लेखेत पाडा जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना दोराच्या सहाय्याने नालापार करून जावे लागत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारण्यात येत असल्याने त्या ठिकाणी तात्काळ पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी करीत सातपुड्यातील रस्त्यावर करोड रुपये खर्च होत असतांना याकडे दुर्लक्ष म्हणजे राजकीय इच्छाशक्तीच्या अभाव असल्याच्या आरोप करण्यात आला भारतीय किसान सेनेने केले आहे.

याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.धडगांव तालुक्यातील काल्लेखेत पाडा जि.प. मराठी केंद्र शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कालीखेत जि.प.शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना नाला पार करुन जावे लागत असून, पावसाळ्यात नाल्याला पुर आल्यामुळे दररोज विद्यार्थ्यांना दोराच्या सहाय्याने पाण्यातून मार्ग काढत नाला पार करावा लागत असतो.
यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवितावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात म्हटले. प्रदेश महासचिव पंडित तडवी, सल्लागार अर्जुन पवार, जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, उपाध्यक्ष अंकित वळवी यांच्या स्वाक्षरी आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, धडगांव तालुक्यातील उमराणी बुद्रुक अंतर्गत असलेली कालीखेत जि.प.मराठी शाळेत इ.१ ली ते ८ वी पर्यंतचे वर्ग आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी कुठलाच रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शिक्षण घेणे जिकरीचे होत आहे. परिसरातील साबरीपाडा, देवपाडा, मेवाडीपाडा, पाटीलपाडा, होळीपाडा, निलरीपाडा, बारीपाडा, आमला बिलान, कुडाईपाडा येथुन दररोज सुमारे ६० ते ७० विद्यार्थी उमराणी जि.प.केंद्र शाळेत शिक्षणासाठी येत नदी नाल्यावर पुल किंवा फरशी नसल्याने शिक्षणासाठी नाला पार करुन विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे नाला पार करतांना विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले तर यास जबाबदार कोण असा सवाल विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
जिल्हा परिषद शिक्षण विभाग मात्र या परिस्थितीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. एकीकडे सातपुड्यातील रस्त्यावर करोडो रुपये खर्च होत असतांना याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. त्यात राजकीय उदासिनतेचाही अभाव मानला जात आहे. शिक्षणापासून एकही विद्यार्थी शासनाच्या धोरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिक्षणापासून कुठलाही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून राज्य व केंद्र सरकार स्तरावरून प्रयत्न होत असतांना जिल्हा परिषदेकडून कालीखेतसाठी पर्यायी रस्ता किंवा नाल्यावर पुल किंवा फरशी बांधण्यात यावी अन्यथा भारतीय किसान सेनेतर्फे तिव्र लढा उभारणार
पंडित तडवी
प्रदेश महासचिव, भारतीय किसान सेना








