तळोदा । प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील शेतशिवारात बिबट्याने एका बोकडर हल्ला केल्याने चिनोदा परिसरातील शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि.१५ आँगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चिनोदा-नवागांव रस्त्यावर असलेल्या नगिन नथ्थू पटेल यांच्या केळीच्या शेताच्या बांधावर जंगल्या हारक्या पाडवी यांच्या शेळ्या व बोकड चरत असतांना केळीच्या शेतातून बिबट्याने एका बोकडवर हल्ला केला. त्यात जंगल्या पाडवी यांचा एक बोकडवर बिबट्याने हल्ला करून मृत्युमुखी पाडल्याने चिनोदा शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचाराने शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासह पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आहे.