नंदूरबार l प्रतिनिधी
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत एक जिल्हा एक उत्पादांमध्ये तृणधान्य , भगर , मोर , बर्टी , राळा , वरई आणि नाचणी पिकांवर प्रक्रिया करिता निवड करण्यात आली आहे . या योजने अंतर्गत निवडलेल्या लाभर्थी उद्योजनकांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन २६ जुलै ते २८ जुलै या कालावधीत कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार येथे संपन्न झाला . यावेळी
जिल्हा अधिकारी मनीषा खत्री यांचा हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी विजय मोहिते यांनी या योजनेचे महत्व , गरज , अनुदान तपशील , उदिष्टे यावर भर दिला . तसेच योजने अंतर्गत उद्योजकांचे क्षमता बांधणी करून शेतमाल प्रक्रियास चालना देण्यात सांगितले . प्रशिक्षणामध्ये राजेंद्र दहातोंडे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख जिल्हास्तरीय प्रशिक्षक यांनी उद्योजकत कृषि विज्ञान केंद्राचा सहभाग व कार्य , शेतमाला मूल्यवर्धित कौशल्य , विक्री व्यवस्थापण सौ . आरती देशमुख विषय विशेषज्ञ गृहविज्ञान जिल्हास्तरीय प्रशिक्षक यांनी तृनधान्य पिकाची प्रक्रिया व त्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री उद्योजकाते करिता मुलभूत कौशल्य विकास या बाबी वर विशेष मार्गदर्शन केले
सोबतचे शासकीय कृषि महविद्यालयाचे प्रा.डॉ. संजय बोराळे यांनी तृणधान्यचे ओळख यावर सखोल मार्गदर्शन केली . ऑनलाईन पध्दतीने डॉ . प्रणिता कडू कृषी विज्ञान घातखेड अमरावती यांनी सामजिक पायभूत सुविधा अंतर्गत उत्पादनाचे लेबलिंग , ब्रँडींग व मार्केटिंगसाठी आणि अन्न सुरक्षा व गुणवत मानके या विषयी मार्गदर्शन केले .
या तीन दिवसीय प्रशिक्षणा मध्ये नाचणीच्या बिस्किट प्रत्यक्षिक करून दाखविण्यात आले . प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रमामध्ये जिल्हा अधिकारी मनीषा खत्री , अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर , जिल्हा उद्योग केंद्राचे पाटील , पशूसंवर्धन विभागचे यु . डी पाटील व राजेंद्र दहातोंडे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार आणि जिल्हा संसाधन व्यक्ती विलास घरटे , विवेक चौधरी हे उपस्थीत होते .
समारोपीय कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर लाभर्थी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घाव असे आवाहन केले. आणि काही अडचण आल्यास कृषि विभाग शी संपर्क कवा असे सांगितले . जिल्हा अधिकारी मनीषा खत्री , जिल्हा कृषि अधीक्षक निलेश भागेश्वर व राजेंद्र दहातोंडे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषि विज्ञान केंद्र नंदुरबार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप कण्यात आले .