नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित माध्यमिक विद्यालय शेजवा पो.पिंपळोद ता. नंदुरबार शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक दत्तु पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपशिक्षक दिपक वळवी यांनी केले. त्यानंतर शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या ठराविक विद्यार्थी विद्यार्थिनींनी “भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे” यांच्या जीवनावरील प्रसंगांना उजाळा दिला.
त्यानंतर शाळेचे उपशिक्षक विजय पवार, रामानंद बागले, श्रीमती संगीता गोखले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केलेल्या महान कार्यावर प्रकाशज्योत टाकली. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक दत्तु पाटील यांनी या थोर लोकांनी केलेल्या कामाचा वारसा आपण आपल्या शैक्षणिक कामात कसा उपयोगी पडेल ह्या विषयी चिंतन केले तरच खरोखर आजच्या दिवशी त्यांना आदरांजली असेल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे क्रिडा शिक्षक संजय बोरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या कनिष्ठ लिपिक श्रीमती नेहा शर्मा, शाळेचे शिपाई संजय वसावे, दिनेश पवार, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता वन्दे मातरम् गीताने करण्यात आली.