नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय ज्युनियर व सबज्युनियर नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धा 2022-2023 क्रीडा स्पर्धांचे आयोजन 2 सप्टेंबर ते 9 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत नवी दिल्ली येथे होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंचे वय सबज्युनियरसाठी 15 वर्षांखालील असावे. जन्मतारीख 1 नोव्हेंबर 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेला असावा. तर ज्युनियरसाठी 17 वर्षांखालील मुले,मुली जन्मतारीख 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेला असावा.
नेहरु कप हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हास्तरावर 15 वर्षाखालील-सबज्युनियर व 17 वर्षांखालील मुले- मुली ज्युनियरसाठी 4 व 5 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे स्पर्धां होईल.
खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व संघांनी http://nandurbar.mahadso.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज 3 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावे.
स्पर्धेत सहभाग संघांनी प्रवेश अर्ज व त्यासोबत खेळाडुंचा जन्मतारखेचा दाखला जोडून स्पर्धेच्या दिवशी सादर करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नंदुरबार यांच्याशी संपर्क साधावा. तरी सदर स्पर्धेंत अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.








