नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डीएस नाईक प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राजेंद्र शेवाळे, प्रा.आरती तवर, प्रा.एन.एस पाटील, प्रा.पंकज पाटील , प्रा.जयश्री भामरे आदी उपस्थित होते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांबद्दल तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल आपापल विचार मांडले आजच्या कार्यक्रमात वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात प्रथम क्रमांक निकिता बैसाने, द्वितीय मनीषा नाईक, तृतीय कीर्ती वळवी, पंकज पाटील यांनी या कार्यक्रमात मान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल आपले विचार मांडताना त्यांच्या कर्तृत्वाविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.संजय मराठे, प्रा.योगेश चौधरी, प्रा.शीतल दोडे, दादाभाई पिपले यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शैलेंद्र पाटील तर आभार प्रा.कोकिळा बंजारा यांनी मानले.








