नंदुरबार ! प्रतिनिधी
का.वि.प्र.सं भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता.जि.नंदुरबार शाळेत
प्रमुख अतिथी दगा आत्माराम पाटील यांच्या शुभ हस्ते 75 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी भालेर ग्रामपंचायत सदस्य सौ.इंदुबाई वल्लभ पवार यांच्या शुभहस्ते मागासवर्गीय कन्या छात्रालयाचे ध्वजारोहण करण्यात आले.सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष पद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांनी स्वीकारले. यावेळी कार्यक्रमाला कार्याध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ, भालेर येथील सरपंच सौ. जागृती राहुल पाटील, काकर्दे येथील सरपंच ,उपसरपंच, शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष भालेर, नगाव,तिसी, काकर्दे , वडवद येथील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्तेbकोरोना काळात वैद्यकीय सेवा देणारे डॉ. विजय बोरसे, डॉ. राकेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता दहावीत प्रथम पाच विद्यार्थिनी, इयत्ता बारावीत प्रथम पाच विद्यार्थिनी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यालयातील पाचवी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायले.यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य सौ. विद्या चव्हाण, पर्यवेक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन अनिल कुवर यांनी केले.तसेच तंबाखू मुक्त शपथ दिली.शिक्षक के.एस. बागुल यांनी कार्यक्रमाचे फलक लेखन केले. विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.पी. एस. सूर्यवंशी आभार मानले. कार्यक्रमात कोविड 19 च्या नियमांचे पालन करण्यात आले.