बोरद l प्रतिनिधी
बोरद येथे अल्काईनगर याठिकाणी एका हॅन्ड पंपाचे उद्घाटन करण्यात आले. तर १६० मीटर रस्ता लोकार्पण सोहळा आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला.
जनसुविधा अंतर्गत राम मंदिर ते हनुमान मंदिर १०० मीटर काँक्रिटीकरण व पुण्यपावन मंदिर येथे ६० मीटर रस्ता कॉंक्रिटीकरण जि. प. सदस्य सुनीता भरत पवार,प.स. सदस्य विजय राणा यांच्या प्रयत्नाने करण्यात आला. यावेळी आमदार राजेश पडवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ठेकेदारांनी काम करताना उत्कृष्ट दर्जाचे केले पाहिजे .कामाची क्वालिटी चांगली असेल तर रस्ता जास्त टिकेल.
या वेळी बोरद ते वेळावद ४ किमी प्रस्ताव, गावातील बायपास रस्त्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार राजेश पाडवी यांच्याकडे केली त्यावेळी पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात होईल असे आश्वासन पाडविनीं दिले.
यावेळी दिलीप गोसावी प.स. बांधकाम विभाग अभियंता, जि. प. सदस्य सुनिता पवार ,भरत पवार प.स. सदस्य विजय राणा, नारायण ठाकरे, प्रविनसिंग गिरासे,भरत राजपूत,दरबारसिंग पाडवी, गोपी पावरा, मंगेश पाटील, बाबूलाल चित्ते, रवींद्र भिलाव, साजन शेवाळे, विठ्ठल धोडरे, विनोद शेवाळे, गुलाबसिंग राजपूत, दीपक जाधव, संजीव ठाकरे, अविनाश कोळी. आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच न्यूबन येथे जि. प. सदस्य सुनीता भरत पवार यांच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून हॅन्ड पंपचे उद्घाटन आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले तर जन सुविधा अंतर्गत सुनीता भारत पवार यांच्या निधीतून १५० मीटर काँक्रिटीकरनाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.








