नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरातील गणेश नगरात राहणारा १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा क्लासेसला गेला मात्र घरी परत न आल्यामुळे अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा शहरातील गणेश नगरातील सार्थक कांतीलाल साळवे हा १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा सुरभी क्लासेस येथे गेला होता. मात्र संध्याकाळपावेतो घरी परत आला नाही.
शहादा शहरात व आजूबाजूच्या परिसरात, मित्र, नातेवाईकांकडे शोध घेतला असता आढळून आला नाही. याबाबत कांतीलाल पुनाजी साळवे यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.संजय ठाकूर करीत आहेत.