नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा शहरात मध्यरात्री अज्ञात दोन व्यक्तींकडून मोटरसायकल व जनरेटरवर पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा शहरातील गरीब नवाज कॉलनीत मध्यरात्री स्विफ्ट चार चाकी वाहनाने आलेल्या दोन अज्ञात इसमांनी जनरेटर व दोन दुचाकींवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रकार समोर आला आहे.
समाजकंटकांद्वारे केलेले हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून नागरिकांनी याबाबत पोलिसांना खबर दिली आहे. शहादा पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले दोन्ही अज्ञात व्यक्ती चार चाकी वाहनाने आल्यानंतर तोंडाला मास्क लावून गाड्या व जनरेटर वर पेट्रोल टाकून जाळत असल्याचे समोर आले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी लागलीच पोलिसांना माहिती दिल्याने घटनास्थळी पोलिसांनी दाखल होते.
गाड्या विजवल्याची माहिती स्थानिक नागरिकांना दिली आहे. अज्ञात माथेफिरूनी चार जनरेटर व दोन दुचाकी वर पेट्रोल टाकून आग लावल्यानंतर पोबारा केला होता अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या घटनेबाबत अधिक तपास शहादा पोलीस करीत आहे.