नंदुरबार l प्रतिनिधी
मुंबई येथील एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतून जर गुजराथी व राजस्थानी बांधवांनी काढता पाय घेतला तर महाराष्ट्र व मुंबई कंगाल होईल, असे वक्तव्य करुन महाराष्ट्रातील मराठी जनतेचा घोर अपमान केला असून हा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. अशा वक्तव्यांचा व राज्यपालांचा आम आदमी शेतकरी संघटना जाहीर निषेध केला.
राज्यपालांनी आपल्या राज्यपाल असल्याची जाणीव ठेवून वक्तव्य केले पाहीजेत. परंतू महाराष्ट्राच्या राज्यपालांनी आपल्या पदाची कुठलीही गरीमा न बाळगता महाराष्ट्रातील महापुरुषांविषयी बदनामीकारक वक्तव्य करणे, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करणे असे उद्योग सुरु ठेवले असून ते राज्यपाल पदा आडून
भारतीय जनता पार्टीचा एकप्रकारे प्रचारक म्हणून काम करत असून अशा व्यक्तीस राज्यपाल पदावर राहण्यास कुठलाही नैतिक अधिकार नसून केंद्र शासनाने भगतसिंग कोश्यारी यांना त्वरीत राज्यपाल पदावरुन हटवावे व भाजपच्या प्रचारकार्याची जबाबदारी सोपवावी. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्राने त्वरीत हटवावे. अशा जातीभेदी, वर्णभेदी व्यक्तीला राज्यपाल पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही.