नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील डामरखेडा येथे घराशेजारी ठेवलेली लाकडे न उचलल्याने एकास काठीने व दगडाने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील शामा जंगल्या वळवी यांनी घराशेजारी पडलेली लाकडे उचलली नाहीत. या कारणावरुन शाम वळवी यांना कृष्णा रमेश ठाकरे याने काठीने मारहाण केली. तसेच दगडाने कानाजवळ मारुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत शामा वळवी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात कृष्णा ठाकरे याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मेहेरसिंग वळवी करीत आहेत.