नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील राजविहिर येथून मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील राजविहिर येथील एका १६ वर्षीय मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले.
याबाबत मुलीच्या वडीलांनी तळोदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात इसमाविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत.