नंदूरबार l प्रतिनिधी
जुलै महिन्यातील 31 तारखेला श्रावण महिन्याच्या पहिल्या रविवारी कानुबाई मातेची स्थापना होणार आहे. त्यानिमित्त देवीचे मुखवटे तयार करण्यासाठी मूर्तिकार सज्ज झाले आहे. रंगरंगोटी करणे व दागिन्याने सजावट करणे अशा प्रकारे खानदेशात कानुमातेच्या उत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. खान्देश सहित गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून देखील लोक कानुमातेचे मुखवटे बनविण्याकरिता येत असतात.
नंदुरबार येथील जळका बाजार परिसरातील रहिवासी असलेले मूर्तिकार कै. छबाबाई नामदेव कन्हेरे हे मातेचे मुखवटे तयार करीत होते. आता त्या परिवारातील सुनबाई भारती कन्हेरे ह्या मूर्ती बनवण्याचे काम करीत आहे . 4 थ्या पिढीपासून चालत येत असलेला काम सध्या भारती कन्हेरे हे करीत आहे. कन्हेरेची कानुबाई म्हणजे कन्हेर म्हणजे शंकर भगवानचा अवतार व कानुबाई माता म्हणजे पार्वती मातेचा अवतार म्हणून कानूबाई मातेला कन्हेरची कानुबाई म्हणतात.
खान्देशात गेल्या 80 ते 90 दशकापासून मातेची स्थापना होत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात कानुबाई मातेचा उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र होते आणि यावर्षी ही त्याचा परिणाम दिसून येत आहे.
कानुबाई मातेच्या मुखवटे बनविण्यासाठी मुखवटे दुरुस्ती करणे १२०० रुपये रंगकाम ७०० रुपये व नवीन कानुबाई चे मुखवटे घडविणे 2500 रुपये ते 3000 रु एवढा खर्च लागत असतो . हे सर्व मुखवटे मेना पासून बनविण्यात येते .
कारण मेणापासून बनवलेल्या मुखवटांना मोठा मान असतो कन्हेरे कुटुंबांनी म्हटले आहे, काही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुखवटे तयार होत असतात आणि त्या मुखवट्यांचे जास्त पैसे आकारले जातात . खरंतर नारळ व पिवळ्या व काळ्यामेना पासून तयार केले जाणाऱ्या मुखवट्यांना धार्मिक दृष्ट्या जास्त महत्त्व आहे ज्येष्ठाच्या माहितीनुसार मेनाने केलेली कानबाई हे नवसाला पावते असे कन्हेरे कुटुंबीयांनी सांगितले आहे.
यावर्षी संपूर्ण जिल्ह्यात 400 ते 600 जणांकडे कानुमातींची घरोघरी स्थापना केली जाणार आहे .देवीच्या दोन दिवसाच्या उत्साहासाठी भाविक सज्ज झाले आहेत असे भारती कन्हेरे यांनी सांगितले.