नंदुरबार l प्रतिनिधी
भाजप नगरसेविका ज्योती योगेश राजपूत यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका ज्योती योगेश राजपूत यांनी स्वीकृत नगरसेवक पदाच्या राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने ज्योती राजपूत यांचं नाव सुचवण्यात आलं होतं त्यानुसार, स्वीकृत नगरसेवकपदी त्यांची निवड करण्यात आली होती.
नगरसेविका ज्योती राजपूत यांनी जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांच्याकडे पदाच्या राजीनामा सोपवला. ज्योती राजपूत यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यांच्या सत्कार केला.
यावेळी माजी कृषिमंत्री आ.दादा भुसे, आ.संदिपान भुमरे,आ.संजय राठोड, शिवसेना नेते यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.