नंदुरबार l प्रतिनिधी

येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे व्हॉईस ऑफ नंदुरबार, पर्व 4 थे या करावोके गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे पहिले ऑडिशन दि. 31 जुलै रोजी नंदुरबार शहरातील राजे शिवाजी माध्यमिक विद्यालय, शहादा रोड येथे होणार आहे.
व्हॉईस ऑफ नंदुरबार या स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष. या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यातील गायक कलावंत सहभागी होत असतात. या स्पर्धेत लहान गट व खुला गट असे दोन गट असून यात वय वर्षे 5 ते 14 दरम्यान लहान गट असून वय वर्षे 15 च्या पुढे मोठा गट आहे. या गटात कोणीही सहभागी होऊ शकते.
सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे, असे आयोजकांनी सांगितले आहे. ऑडिशन फेरीतील विजेत्यांमधून अंतिम फेरी साठी निवड केली जाईल. अंतिम फेरी हि 15 ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरातील इंदिरा मंगल कार्यालय येथे होणार आहे. या स्पर्धेत मोठ्या गटातील पहिल्या तीन विजेत्यांना 11,000 रुपये, 7,000 रुपये व 5000 रुपये तर लहान गटातील विजेत्यांना 3100 रु., 2100 रु., व 1100 रु किंमतीचे आकर्षक भेटवस्तू स्वरूपात पारितोषिक देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा पारदर्शक व उच्च दर्जाची व्हावी,
या उद्देशाने स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील संंगित क्षेत्रातील तज्ञ व नामवंत गायक परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेच्या प्रत्यक्ष नोंदणीसाठी यश डिजिटल, आमदार कार्यालयासमोर, नंदुरबार व सॅमसंग गॅलरी, अहिल्याबाई विहिरीजवळ या ठिकाणी संपर्क साधावा. या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी 7020831617, 8830878064, 8087515309, 9175300002, 7709982323 या क्रमांकावर संपर्क साधावा.
या स्पर्धेत जास्तीत जास्त संगित प्रेमी स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष अनिल शर्मा, सचिव किरण दाभाडे, प्रोजेक्ट चेअरमन नागसेन पेंढारकर, को -प्रोजेक्ट चेअरमन विजय मंगलानी, आकाश जैन, हर्षल पाटील, राहुल पाटील, आकाश जैन, मुर्तुझा वोरा, विवेक जैन व रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.









