शहादा l प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी शहादा शहरमार्फत काॅग्रेसचे लोकसभा गटनेते खा.अधिर रंजन चौधरी यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले .

काँग्रेसचे लोकसभा मधील गटनेता अधिर रंजन चौधरी यांनी देशाचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांच्या संदर्भात असंवैधानिक व अशोभनीय भाषेचा वापर केल्यामुळे काँग्रेस पक्षाचा व अधिर रंजन चौधरी यांचा धिक्कार करण्यात आला.
प्रांताधिकारी कार्यालयासमोर अधिरंजन यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कल्पनाताई पंड्या, शहाध्यक्ष विनोद जैन यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
यावेळी आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, ओबीसी जिल्हाध्यक्ष अनामिकाताई चौधरी,महिला उपाध्यक्ष नंदाताई सोनवणे , डॉ.योगेश चौधरी, शहर उपाध्यक्ष पंकज सोनार, अक्षय अमृतकर ,महामंत्री हितेंद्र वर्मा , वैभव सोनार, युवा अध्यक्ष राजीव देसाई, सचिव प्रशांत कदम,कामगार आघाडी जितेन्द्र शिकलिकर,
युवा उपाध्यक्ष रोशन जैन, रुपेश पाटील, सचिव लव लोहार, जिल्हा उपाध्यक्ष संगीताताई पाठक, घनश्यामभाऊ पाठक, काशिनाथभाई सोनार यांच्या सह शहर कार्यकर्ते व जिल्ह्याचे पदाधिकारी व सदस्य व शहर चे संपूर्ण आघाडी व मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.









