नवापूर l प्रतिनिधी
भारत देशाच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांच्यावर अपशब्द व असंवैधानिक भाषेचा वापर केल्याने काँग्रेस पक्षाचे खासदार अधिर रंजन चौधरी यांच्यावर कडक कार्यवाही होण्याबाबतचे निवेदन नवापूर तालुका भाजपातर्फे तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना देण्यात आले.

सकाळी ११ भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत यांच्या कार्यालयापासुन निषेध मोर्चा काढण्यात आला.मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गाने निघुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुळ्याला पुष्पहार अर्पण करुन बसस्थानक परीसरात काँग्रेस पक्षाचे खासदार अधिर रंजन चौधरी यांच्या पुतळ्याला चपलांनी मारुन तो दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,अशोक मोकळ,मनोज पाटील यांनी पुतळा हिसकावुन पोलिस गाडीत टाकुन पोलिस स्टेशन येथे आणला.
या नंतर भाजपाच्या महिलांनी तहसिलदार यांना निवेदन दिले. निवेदना मध्ये म्हटले आहे की, सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असुन काँग्रेस पक्षाचे खा. अधिर रंजन चौधरी यांनी संसदेत भारत देशाच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदजी मुर्मू यांचा राष्ट्रपत्नी असा अपशब्द व असंवैधानिक भाषेचा वापर केल्याने देशाच्या सर्वोच्च नागरीकांचा तसेच समस्त आदिवासींचा अपमान केलेला आहे. म्हणुन भाजपानवापूर या घटनेचा तीव्र जाहीर निषेध करीत आहे. त्यांच्यावर कडक कार्यवाही होण्यासाठी भारतीय जनता पार्टी, नवापूर विनंती करीत आहे.
देशाचे महामहिम राष्ट्रपती व सर्वोच्च नागरीकाचे व समस्त आदिवासींचा अपमान केलेला असल्याने म्हणुन काँग्रेस पक्षाचे खासदार अधिर रंजन चौधरी यांच्यावर कडक कार्यवाही करा.असे निवेदना मध्ये म्हटले आहे निवेदनावर भारतीय जनता पाटीचे तालुका अध्यक्ष भरत गावीत,जि.प सदस्य संगिता गावीत,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,जाकीर पठाण,अजय गावीत,नगरसेवक महेंद्र दुसाने,माजी नगरसेवक रमला राणा,शहराध्यक्ष प्रणव सोनार,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश चौधरी,जितेंद्र अहिरे,हेमंत जाधव,
कुणाल दुसाने,सप्नील मिस्ञी,जिन्नेशा राणा,दुर्गा वसावे,माजी नगरसेवीका सुनिता वसावे,पवन दाडवेकर ,निलेश प्रजापत,गोपी सैन,जहुर खान,सजात बदुडा,जैन्या गावीत,हर्षश गावीत,भिमसिंग पाडवी,भाविन राणा,सौरव भामरे,शंभु सोनार आदीच्या सह्या आहेत.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत,संगिता गावीत,राजेंद्र गावीत यांनी मनोगत व्यक्त केले.कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,उपनिरीक्षक अशोक मोकळ,मनोज पाटील,पो हे का निजाम पाडवी,पवन राजपूत,नितिन नाईक,दादाभाई वाघ,पंकज सुर्यवंशी,विकी वाघ यांनी चोख बदोबस ठेवला होता.








