नवापूर l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्र ७ चा शिवसेना नगरसेविका अरूणा पाटील यांच्या प्रयत्नाने बाल उद्यानाच्या लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
या वेळी शिवसेना व युवासेना तर्फे मान्यवराचा हस्ते उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले व बालगोपाल खाऊ व मिष्टान्न वाटप करण्यात यावेळी गटनेते आशिष मावची,विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक विश्वास बडोगे, महेंद्र दुसाने,विशाल सांगळे,नगरसेविका मंगला सेन, सविता नगराळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख हंसमुख पाटील, माजी नगरसेवक अजय पाटील, संजय राणा, सुभाष कुंभार,विजय सेन,
प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार,अंनत पाटील, शहरप्रमुख अनिल वारूडे, युवासेना उपजिल्हा अधिकारी दिनेश भोई,किसन सिरसाट,उपशहरप्रमुख फिरोज कुरेसी,दिनेश खैरनार,दगडू भोई, रवींद्र पाटील, नामदेव लोणारी, नवल पाटील, उज्वला वडनेरे,सुमन पाटील, कोकीला पाटील, कल्पना पाटील,सुनिता पाटील,हवसाबाई लोणारी, चंदबेन राणा, परिसरातील सर्व नागरिक व बाल गोपाल मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा सौ. हेमलता पाटील,नगरसेवक विशाल सांगळे,विश्वास बडोगे,महेंद्र दुसाने,हसमुख पाटील,अनिल सोनार,अरुना पाटील,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनंत पाटील यांनी केले.








